लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे
आज एक बाजी मेला तरी अशी लाखो बाजी तयार होतील राजे तुम्ही विशालगड गाठा
भूपा हिर्दसो भ्धुतः प्रभुत भिजन प्रियाः ।।
मज्जैत्र यत्राः कुवर्णा: प्रोल्लो सन्ति पदे पदे ।।
.
अर्थ : हिरडस मावळचे अतिशय लोक प्रिय राजे बांदल माझी विजय यात्रा यशस्वी करत, पावलो पावली सैन्याचा आणि माझा जोम वाढवीत आहेत. असे वर्णन खुद्द छत्रपती संभाजी महाराजांनी केले त्या बांदल घराण्यातील रण मर्दांच्या नेत्रदीपक कामगिरीचा दिवस म्हणजे १३ जुले १६६०...
१३ जुले १६६०ची गजा पुरच्या खिंडीतील ६ प्रहर. आदल्या रात्री महाराज बाजी बांदल यांच्या हिरडस मावळातील शेतकऱ्यांची, कष्टकारयांची फौज घेऊन सुद्धी जौहर च्या पन्हाळ्याच्या वेढ्यातील फौजेला गुंगारा देऊन निघाले . स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर , सरनोबत ,शिलेदार , हजारो स्वराज्याचे सैन्य सुद्धा हा वेढा फोडू शकले नव्हते पण फक्त बांदलांच्या ६०० शिबंदीच्या जोरावर राजांनी हि धाडसी मोहीम आखली आणि फत्तेही केली . कारण मागे अशाच एका रणसंग्रामात हिरडस मावळ च्या बांदलांनी आणि कारीच्या जेध्यांनी असा तुफान पराक्रम गाजवला होता कि अफजलखानच्या सैन्याचा साफ चुराडा झाला होता .
.
त्यावर राजांनी अज्ञान दासाकडून पोवाडा सम गाठताना अज्ञानदासाच्या ओळी चपखल बसतात :
अज्ञानदास विनवी श्रोत्याला राजा अवतारी जन्मला
नळ निळ सुग्रीव जांबुवंत अंगद हनुमंत रघुनाथाला
एकांती भांडण जैसे रामरावणाला तैसा शिवाजी सर्जा एकांती ना आटोपे कवणाला
जेधे बांदल तैसे शिवाजीला दृष्टी परी यश शिवाजी राजाला कलीमधी अवतार जन्मला
.
त्यामुळे या मोहिमेसाठी निवड झाली ती बांदल सेनेची . हि फौज सैह्याद्री च्या वाघाला मगर मिठीतून सोडवणार होती . काळ सर्पाच्या विळख्यातून स्वराज्य सोडवनार होती , हि निघणार होती गजापुरची खिंड पावन करायला त्या फौजेत हिरडस मावळातील दोन पाणीदार मोती बांदलांच्या तुरयात चमकत होते बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे .
बरोबर होत्या ६०० नाग्या तलवारी ,ढाली धरण केलेले वीर शंभूसिंग जाधवराव खाटपे , विचारे , चोर , गव्हाणे , कोंढाळकर , शिरवळे ,पोळ , पारठे , शिंदे , महाले समस्त मावळातील २ बलुतेदार . बांदलाच्या या रणबहाद्धारांनी खिंडीत गनीम थोपवले . तब्बल ४००० फौजे विरुद्ध बाजी बांदल यांनी ३०० शिबंदी सह खिंडीत आणि वर जसवन्तरावाचा वेढा फोडायला आणि त्याच्या विरुद्ध झुन्झायला रायाजी बांदल ,तसेच शिवरायांना गडावर सुखरूप पोहोचवायची कामगिरी बांदलाच्या पिता पुत्रांच्या खांद्या आणि तमाम हिरडस मावळच्या शिबंधी वर होती .
या दोन्ही तुकड्यांनी दोन्ही कामगिऱ्या चोख बजावल्या. खिंडीतील बांदलांच्या तुकडीवर हल्यावर हल्ले होत होते .मसूदने सपाटा लावला होता खिंडीत मावले अड्सारासारखे उभे राहिले रात्रभर झुंज चालली . बांदालांची निम्मी तुकडी गारद झाली होती बाजी , फुलाजी , आणि बरेचशे वीर गारद झाले पण तरीही खिंड अभेद्यच राहिली होती . सर्वांचे कान इशारातींच्या तोफेकडे लागले होते आणि इकडे मासुदाचे मासुदाचे सगळे सैन्य गारद ह्वायला आले होते हजारोंची फौज अवघ्या शेकड्यात उरली होती . आणि इतक्यात तोफ धाडली बांदल सेनेने सुटकेचा निश्वास सोडला कारण स्वराज्याचा प्राण सुखरूप होता .
आणि विशेष म्हणजे सिद्धी मसूदने देखील निश्वास टाकला तो त्याच्या चरित्रात लिहितो आहे "जर गडावरून तोफ उडाली नसती तर आमचे काहीच खरे नव्हते कारण त्या सदरांच्या तलवारी जणू लाव्हारसाच आमच्यावर ओतत होत्या आमची फौज होत्याची नव्हती झाली, आता माझी स्वताची पाळी होती तोफ उडाली आणि ते लोक गडाच्या दिशेने जंगलात पसार झाले म्हणून आम्ही वाचलो नाही तर अल्लाह ची मर्जी ": ती पावन खिंड बांदलांच्या रक्ताने पावन झालेली ,दाट झाडीत , हिरव्यागार गवती गालिच्यात , निर्जन , एकांतात , सह्याद्रीच्या कुशीत अन विशाळगडाच्या मुशीत . महावीरांच्या पवित्र रक्ताने पावन झालेली , मराठ्यांच्या माने प्रमाणेच ताठ , उंच , आणि अभेध्य . पन्हाळ्या पासून १८ कोसांच्या अंतरावर उंच खाच खळग्यानी आणि कट्याकुट्यानि सजलेली .
एका अजगराच्या विळख्यातून हिरडस मावळच्या वतनदार सरदारांनी स्वाराज्या चे प्राण वाचवले ते याच खिंडीत . त्या मातीला सुगंध आहे मावळ्यांच्या रक्ताचा तेथील पत्थरांना कान लावा मग ऐकू येतील शूरवीर ३०० रण मर्दांच्या डरकाळ्या आणि शौर्यगाथा . स्वराज्यासाठी अनेक मराठ्यांनी आपल्या प्राणाच्या आहुत्या दिल्या महाराजांनी मान पान केला . या भीमपराक्रम नंतर जेधे घराण्याशी मसलत करून स्वराज्याचा सर्वात मोठा मान " धारेच्या पानाच्या पहिल्या समशेरीचा " रायाजी नाईक बांदल यांना देण्यात आला . स्वराज्याचा इतिहास अशाच नरसिंहांनी घड वला त्यापैकीच एक बाजी कृष्णाजी नाईक बांदल आणि त्यांचे पुत्र रायाजी बाजी नाईक बांदल , पण इतिहासाला त्यांची नवे कधी कळलीच नाहीत हे बांदल घराण्याचे दुर्भाग्याच...
शिवरायांच्या प्राणांसाठी व स्वराज्याच्या अस्मितेसाठी आपल्या प्राणांची अहुती देणार्या, शिवा काशिद, बाजी प्रभू देशपांडे, बांदल सेना, जाधवराव, कटके, शिंदे, मोरे, इंगळे व इतर शेकडो नरवीरांना मुजरा.......🙏🙏🚩🚩



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
कृपया आपल्याला काही शंका असल्यास कृपया मला कळवा