शुक्रवार, १७ जुलै, २०२०

क्यू पाटील, और लडोगे ?

इसवी सन १७६०! मराठ्यांच्या दिग्विजयी फौजांनी नुकताच अफगाणिस्तानातल्या खैबरखिंडीत राहणाऱ्या कडव्या पठाणांचा समाचार घेतला होता.मराठा साम्राज्याचा विस्तार अखंड हिंदुस्थानात पसरू लागला होता आणि लाहोरचा बंदोबस्त केल्यानंतर तर मराठ्यांचा राजा दिल्लीवर राज्य करणार हे जवळजवळ पक्के होते.
 आशिया खंडातल्या मुस्लिमांच्या सार्वभौम सत्तेचे केंद्र असणारी दिल्लीची गादी आता मराठ्यांच्या वर्चस्वाखाली येणार हे ओळखून नाजीबखान रोहिल्याने दुराणी बादशहा अहमदशहा अब्दाली सकट इतर सर्व मुस्लिम राजांना इस्लामी सत्तेच्या रक्षणासाठी एकत्र येण्यासाठी खलिते पाठवून विनंत्यांचा रतीब घातला होता.सर्वांनी एकत्र येऊन मराठा फौजेच्या तुफानाला रोखले नाहीतर दिल्ली मराठ्यांची आणि अखंड हिंदुस्थान याची जाणीव परकीयांना झाली होती.येत्या काही काळात दिल्लीच्या क्षितिजावर युद्धासाठी सज्ज झालेल्या घोड्यांच्या टापांच्या धुळीचे लोळ पाहायला मिळणार हे आता जवळजवळ पक्के होते.भारताच्या उत्तरेत शिंदे, होळकर आदी घराण्यांकडे उत्तर हिंदुस्थानातील मराठा साम्राज्यची जबाबदारी होती , याच काळात उत्तरेत ग्वाल्हेर येथे शिंदे तर इंदौर येथे होळकर या मराठ्यांच्या दोन वतनदार सरदारांनी संपूर्ण उत्तर भारताचा प्रदेश आपल्या टाचेखाली ठेवला होता.शिंदे घराण्यातील दत्ताजी शूर होता. अब्दालीने दिल्ली लुटल्यानंतर (१७५७) मराठा साम्राज्याचे मुख्य छत्रपतींच्या आदेशाखाली सूत्र हलवणाऱ्या पेशव्यांनी त्यास उत्तर हिंदुस्थानचा कारभार सुधारण्याचा आदेश दिला. त्याच्यावर नजीबखानाचे पारिपत्य, लाहोरचा बंदोबस्त, तीर्थक्षेत्रे मुक्त करणे आणि बंगालपर्यंत स्वारी करून कर्ज फेडण्यासाठी पैसा उभा करणे इ. जबाबदाऱ्या दत्ताजींवर सोपविण्यात आल्या.
     १७६० सालच्या मकरसंक्रांतीचा दिवस. नजीबचे पारिपत्य करण्याच्या आणि लाहोर सोडवण्याच्या पेशव्यांनी सोपविलेल्या कामगिरी पार पडण्यासाठी दोघे काका-पुतणे उज्जैनहून निघून दिल्लीस आले.
" दत्ताजी मनावर घेतलेले काम पार पाडील '’ असा पेशव्यांचा आढळ विश्वास होता. १७५८ साली दत्ताजीने लाहोर घेतले आणि नाजीबाचा बिमोड करण्यासाठी यमुनाकाठी रामघाट येथे दाखल झाला.
१० जानेवारी. सकाळचे स्नान आटोपून मराठी फौज तयारीनिशी उभी होती. सेनापती युद्धाचा मुकाबला निश्चीत करण्यासाठी यमुनेचा ठाव घेऊ लागले पण तो काही लागेना.हे चालू असतानाच शत्रूचे सैन्य नदी उतरून अलीकडे येऊन थेट हल्ले करू लागले. हे पाहून दत्ताजी चिडला. त्याच्या डोळ्यात युद्धाचा अंगार फुलू लागला. जणूकाही तो याच क्षणाची वात पाहत होतं.
क्षणाचाही विलंब न करता दत्ताजीने आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या. आणि एका तुकडीच्या सोबत त्याने आपल्या सजवलेल्या लाल्मानी घोड्यावर मजबूत मंद टाकत रणांगण जवळ केले.
मागचे मराठी सैन्यही त्वेषाने रणांगणाच्या दिशेने झेप घेऊ लागले. नजीब आणि गीलच्यांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी मराठी सैन्य आसुसले होते.
हर हर महादेव ची गगनभेदी गर्जना करत मराठी सैन्य शत्रूला भिडले. रणांगणावर तलवारीच्या खणाखनीने, घोड्यांच्या खिकाळ्यानी आणि वीरांच्या घोषणांनी नुसता हाहाकार माजवला.
     एका प्रहारापुर्वी निपचित पडलेल्या घाटाचे रूप पार पालटून गेले. मराठ्यांकडे बंदुका नव्हत्याच. त्यात अब्दालीचे सैन्य म्हणजे ताज्या दमाचे अफगाण पठाण.
त्यांच्या बंदुकीच्या माऱ्यापुढे तलवारीने लढणारे मराठे किती काल तग धरणार? एक एक मराठा सैनिक बंदुकीच्या गोळ्यांनी जायबंदी होऊ लागला. मराठ्यांच्या प्रेतांचा नुसता खच घाटात पसरलेला दिसू लागला.
पण दत्ताजीला तर फक्त समोर येणारा अफगाण आणि त्याची मुंडी दिसत होती. त्याची तलवार विजेसारखी चालत होती.
ही पड कमी होती की काय म्हणून दोन धक्कादायक खबरी घेऊन शिपाई दत्ताजींकडे धावत आला. मालोजी फौजेसह मराठ्यांच्या मुडद्यांच्या राशीत दिसेनासा झाला होता आणि गनिमांनी एकाच वेळी  तिन्ही बाजूंनी हल्ला केला होता.
रणमदाने बेहोष झालेल्या दत्ताजीने पुन्हा लालमणीला टाच दिली. हातात तळपती तलवार, पाठीवर ढाल आणि शिरावर शिरस्त्राण घेतलेल्या दत्ताजीचा रणमर्द अवतार पाहून मराठी सैन्यात पुन्हा नवे स्फुरण चढले.
तलवारीच्या प्रत्येक घावासरशी यवनाचे मुंडके धडावेगळे होत होते. शीर नसलेल्या धडातून रक्ताच्या धारा बरसत होत्या. दत्ताजीची तलवार गनिमांना मराठ्यांच्या शौर्याची ओळख पटवून देत होती.
    बऱ्याच वेळापासून जरीपटक्याजवळ निकराने गिलच्याना पाणी पाजत असलेल्या जनकोजीच्या दंडावर गोळी लागली आणि तो घोड्यावरून खाली कोसळला. ही बातमी दत्ताजीला पोचवण्यात आली.
हे ऐकून सुडाने लाल झालेला दत्ताजी दिसेल त्या आफ्गानाच्या बरगडीत तलवार खुपसू लागला. जय भवानी जय जगदंब च्या नावाचा जयघोष करत रणांगणात त्याने मृत्यूचे तांडव माजवले.
इतक्यात हाकेच्या अंतरावर लढत असलेला नजीब त्याला दिसला. कानाच्या पाळ्या तप्त झाल्या. छातीवरची बाराबंदी ताठ झाली. बाहू स्फुरण पावू लागले. वाटेत दिसेल त्या अफगानाचे शीर धडावेगळे करत दत्ताजी नाजीबाकडे झेपावला.
इतक्यात कुठूनतरी जम्बुरक्याचा गोळा धडधडत येऊन दत्ताजीच्या बरगडीला छेदत लालमनीच्या पाठीवर पडला तसा दत्ताजी घोड्यावरून जमिनीवर कोसळला.
हे दृश्य पाहताच नजीब आणि कुतुबशहा सैतानासारखे दत्ताजीकडे झेपावले. दत्ताजी तलवार उचलण्यासाठी धडपडत असल्याचे पाहून कुतुबशहाने त्याचे डोके हातात घेतले. डोळ्यासमोर भला नाचवत म्हणाला,
“क्यू पाटील, और लडोगे?”
हे ऐकताच उरलेली ताकद ऐकवतात रणशूर दत्ताजीने वाघासारखी डरकाळी फोडली,
“क्यो नही, बचेंगे तो और भी लडेंगे!”
दक्षिणेत निजामाला आणि उत्तरेत अब्दालीला पाणी पाजणार्या मराठा वीराची ती डरकाळी कानावर पडताच कुतुबशहा दत्ताजीच्या जखमी शरीरावर मांड ठोकून बसला आणि त्याच्या छातीची नुसती चाळण करू लागला.
अंगात भूत शिरल्याप्रमाणे नजीबाने हातातला जमदाडा दत्ताजीच्या मानेवर घातला आणि त्याचे शीर धडावेगळे केले.


दत्ताजीचा देह हळूहळू रक्ताने माखत थंड पडू लागला. एका गिलच्याच्या हातातला भाला हिसकावून घेत नजीबाने त्यावर दत्ताजीचे शीर खोवले आणि बेभान होऊन मैदानात नाचवू लागला.
दत्ताजीची अवस्था पाहणाऱ्या मराठा सैन्याला अभय द्यायचे सोडून त्यांच्या कत्तलींचा आदेश देऊन तसाच नाचत अब्दालीकडे निघून गेला.
दत्ताजी पडले! मराठ्यांच्या त्रिखंडात गाजलेल्या दिग्विजयी सैन्याचा हारीचा मोहरा निखळला. बुराडी घाटातल्या धरणीला काळजाचा ठोका चुकल्यासारखे वाटू लागले.
यमुनेच्या प्रवाहाला क्षणभर थांबल्यासारखे वाटले. हे विद्रूप दृश्य पाहत असलेले अफगाणी देखील स्तब्ध झाले.
शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निश्चय तिळमात्र ढळू न देता बुराडी घाटाला दत्ताजीने रक्ताचा अभिषेक घातला. तो दिवस म्हणजे १० जानेवारी १७६०.
पानिपतच्या युद्धात मराठे हरले हा इतिहास आहे. पण ताज्या दमाच्या अफगाणी फौजांपुढे परमुलखात जाऊन मराठी फौजांनी अतुलनीय शोर्य गाजवले आणि मराठी माणसाच्या लढवय्या बाण्याचे दर्शन शत्रूला घडवले हे नाकारून चालणार नाही.
म्हणूनच कित्येक इतिहासकारांनी पानिपतचे वर्णन “पराजयातला असामान्य विजय” असे केले आहे.
काळ मागे पडत राहील, पण इतिहासात पाहिलं तर मराठी माणसाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दाखवलेलं असामान्य धैर्य नव्या पिढीला कायम प्रेरणा देत राहील…
      बुराडी घाटाच्या त्या धरणीमातेला स्वतःचा ठोकाच जणू चुकल्यागत वाटू लागले.... नदीच्या पाण्याला दिशा सैरभैर वाटू लागली... अवतीभवतीच्या झाडाला, पानांना कंठ दाटून आला....हे भयावह दृश्य पहात असलेले अफगाणी गिलचे देखील स्तब्ध झाले..
आपल्याच स्वतःच्या धरणीवर या मर्द मराठ्याने बुराडी घाटाच्या त्या रणांगणावर रक्ताचा अभिषेक केला....
पण निश्चय मात्र तिळमात्र ढळू दिला नाही.. ना माघार घेतली ना नुसता माघार घेण्याचा विचार केला....
अशा नरपुत्राला, रणमर्दाला, मर्द मराठ्याला, सह्याद्रीच्या ढाण्या वाघाला, आम्हां तमाम मावळ्यांचा त्रिवार मुजरा...
"दत्ताजी आमचा जीव जाईल... कदाचित चंद्रतारेही नष्ट होतील... परंतु आपल्या अतुलनीय अनाकलनीय साहसाला बलाक पराक्रमाला हा बुराडी घाटच काय पण आम्ही असंख्य मावळे आम्ही मराठे कधीही विसरू शकणार नाही.  


मंगळवार, १४ जुलै, २०२०

असे होते छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज !

विश्ववंदणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आजवर
जगभरातील इतिहास अभ्यासकांनी विविधांगी भरपूर लेखन केलेले आहे..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध गुणांवर, त्यांच्या मोहिमांवर व
त्यांच्या प्रशासन, राजकारण, धर्मकारण, अर्थकारण यासह त्यांच्या
गड-किल्ल्यांबाबत व त्या गड-किल्ल्यांच्या बांधकाम तंत्राबाबत हि बरेच लिहीले गेलेले आहे. मुळामध्ये छत्रपती शिवराय म्हणजे
अखंडपणे प्रवाहित असणारा प्रेरणादायी झरा आहेत. कित्येकांच्या
जगण्याची छत्रपती #शिवराय हि जणू जीवनप्रणालीच आहेत. असे
अनेकांची जीवनप्रणाली असणारे छत्रपती शिवराय नमेके कसे होते ?
हे आपण या लिखानाच्या माध्यमांतून मांडण्याचा-पहाण्याचा प्रयत्न
करणार आहोत. छत्रपती शिवरायांच्या व्यक्तीमत्त्वाचा शोध घेणे हाच
मर्यादित हेतू सदर लिखानाचा आहे छत्रपती #शिवाजी महाराजांची उंची
साडे पाच ते सहा फूट होती. :-छत्रपती शिवरायांचे दैनंदिन राहणीमान
अत्यंत साधेपणाचे होते. त्यांचा दैनंदिन पोशाख हा त्याकाळातील
सर्वसामान्य लोकांप्रमाणेच साधेपणाचा होता.

* छत्रपती शिवराय हे संपुर्ण जीवनभर निर्व्यसनी होते.
* छत्रपती शिवराय हे दिवसातून एकच वेळ जेवन करीत असत.
मोहिमांच्या वेळी कसल्याही प्रकारचा डामडौल नसे. ते फक्त दोन तंबूत राहत असत. #1664 च्या सुरतेच्या मोहिमेत तर राजे तंबू शिवाय
एका झाडाखाली बसलेले आढळतात.
* छत्रपती शिवरायांचा दरबारी पोशाख मात्र लक्षवेधी असे. त्यामध्ये
शुभ्र पार्श्वभुमीवरील वस्त्रांवर फुलाफुलांचा चिटाचा चोळणा, डाव्या खांद्यावर सोनेरी भरतकाम केलेले चढाव, सोनेरी शिरपेच त्यावरील
हिरेजडित तुरा, काळे पीस आणि शुभ्र #मोती राजांच्या शिरपेचाच्या
विशिष्ठ आकारावरुन राजे सहज ओळखू येत. राजांच्या डाव्या हातात लांब आणि सरळ अशी बहुदा भवानी तलवार आणि उजव्या हातात
डाव्या बाजूला खोचलेली कट्यार असा असे.
* छत्रपती शिवरायांच्या चेहऱ्याचे वर्णन असे, काळ्या दाढीमिश्या,
बाजूंचे केस लांब, डोळे मोठे व तेजस्वी, नजर अत्यंत भेदक व सावध, बोलताना स्मितहास्य करीत संवाद साधण्याची खुबी. रंगाने गोरे.
* छत्रपती शिवरायांच्या उंचीच्या मानाने हातांची लांबी नजरेत भरणारी.
* आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काटकसर हा त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा
विशेष गुण होता. अशा या #राजा होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या
सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्त्वाचे धनी असणाऱ्या 

शिवरायांच्या चरणी माझा मुजरा!

पावनखिंड: एक अभेद्य तटबंदी

लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे
आज एक बाजी मेला तरी अशी लाखो बाजी तयार होतील राजे तुम्ही विशालगड गाठा
 
पन्हाळ्याच्या वेढ्यातील सैन्य

भूपा हिर्दसो भ्धुतः प्रभुत भिजन प्रियाः ।।
मज्जैत्र यत्राः कुवर्णा: प्रोल्लो सन्ति पदे पदे ।।
.
अर्थ : हिरडस मावळचे अतिशय लोक प्रिय राजे बांदल माझी विजय यात्रा यशस्वी करत, पावलो पावली सैन्याचा आणि माझा जोम वाढवीत आहेत. असे वर्णन खुद्द छत्रपती संभाजी महाराजांनी केले त्या बांदल घराण्यातील रण मर्दांच्या नेत्रदीपक कामगिरीचा दिवस म्हणजे १३ जुले १६६०...
.
१३ जुले १६६०ची गजा पुरच्या खिंडीतील ६ प्रहर. आदल्या रात्री महाराज बाजी बांदल यांच्या हिरडस मावळातील शेतकऱ्यांची, कष्टकारयांची फौज घेऊन सुद्धी जौहर च्या पन्हाळ्याच्या वेढ्यातील फौजेला गुंगारा देऊन निघाले . स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर , सरनोबत ,शिलेदार , हजारो स्वराज्याचे सैन्य सुद्धा हा वेढा फोडू शकले नव्हते पण फक्त बांदलांच्या ६०० शिबंदीच्या जोरावर राजांनी हि धाडसी मोहीम आखली आणि फत्तेही केली . कारण मागे अशाच एका रणसंग्रामात हिरडस मावळ च्या बांदलांनी आणि कारीच्या जेध्यांनी असा तुफान पराक्रम गाजवला होता कि अफजलखानच्या सैन्याचा साफ चुराडा झाला होता . 
.
त्यावर राजांनी अज्ञान दासाकडून पोवाडा सम गाठताना अज्ञानदासाच्या ओळी चपखल बसतात :
अज्ञानदास विनवी श्रोत्याला  राजा अवतारी जन्मला 
नळ निळ सुग्रीव जांबुवंत  अंगद हनुमंत रघुनाथाला 
एकांती भांडण  जैसे रामरावणाला  तैसा शिवाजी सर्जा  एकांती ना आटोपे कवणाला 
जेधे बांदल तैसे शिवाजीला  दृष्टी परी यश शिवाजी राजाला  कलीमधी अवतार जन्मला 
.
त्यामुळे या मोहिमेसाठी निवड झाली ती बांदल सेनेची . हि फौज सैह्याद्री च्या वाघाला मगर मिठीतून सोडवणार होती . काळ सर्पाच्या विळख्यातून स्वराज्य सोडवनार होती , हि निघणार होती गजापुरची खिंड पावन करायला त्या फौजेत हिरडस मावळातील दोन पाणीदार मोती बांदलांच्या तुरयात चमकत होते बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे . 
.
बरोबर होत्या ६०० नाग्या तलवारी ,ढाली धरण केलेले वीर शंभूसिंग जाधवराव खाटपे , विचारे , चोर , गव्हाणे , कोंढाळकर , शिरवळे ,पोळ , पारठे , शिंदे , महाले समस्त मावळातील २ बलुतेदार . बांदलाच्या या रणबहाद्धारांनी खिंडीत गनीम थोपवले . तब्बल ४००० फौजे विरुद्ध बाजी बांदल यांनी ३०० शिबंदी सह खिंडीत आणि वर जसवन्तरावाचा वेढा फोडायला आणि त्याच्या विरुद्ध झुन्झायला रायाजी बांदल ,तसेच शिवरायांना गडावर सुखरूप पोहोचवायची कामगिरी बांदलाच्या पिता पुत्रांच्या खांद्या आणि तमाम हिरडस मावळच्या शिबंधी वर होती .
 या दोन्ही तुकड्यांनी दोन्ही कामगिऱ्या चोख बजावल्या. खिंडीतील बांदलांच्या तुकडीवर हल्यावर हल्ले होत होते .मसूदने सपाटा लावला होता खिंडीत मावले अड्सारासारखे उभे राहिले रात्रभर झुंज चालली . बांदालांची निम्मी तुकडी गारद झाली होती बाजी , फुलाजी , आणि बरेचशे वीर गारद झाले पण तरीही खिंड अभेद्यच राहिली होती . सर्वांचे कान इशारातींच्या तोफेकडे लागले होते आणि इकडे मासुदाचे मासुदाचे सगळे सैन्य गारद ह्वायला आले होते हजारोंची फौज अवघ्या शेकड्यात उरली होती . आणि इतक्यात तोफ धाडली बांदल सेनेने सुटकेचा निश्वास सोडला कारण स्वराज्याचा प्राण सुखरूप होता . 
 आणि विशेष म्हणजे सिद्धी मसूदने देखील निश्वास टाकला तो त्याच्या चरित्रात लिहितो आहे "जर गडावरून तोफ उडाली नसती तर आमचे काहीच खरे नव्हते कारण त्या सदरांच्या तलवारी जणू लाव्हारसाच आमच्यावर ओतत होत्या आमची फौज होत्याची नव्हती झाली, आता माझी स्वताची पाळी होती तोफ उडाली आणि ते लोक गडाच्या दिशेने जंगलात पसार झाले म्हणून आम्ही वाचलो नाही तर अल्लाह ची मर्जी ": ती पावन खिंड बांदलांच्या रक्ताने पावन झालेली ,दाट झाडीत , हिरव्यागार गवती गालिच्यात , निर्जन , एकांतात , सह्याद्रीच्या कुशीत अन विशाळगडाच्या मुशीत . महावीरांच्या पवित्र रक्ताने पावन झालेली , मराठ्यांच्या माने प्रमाणेच ताठ , उंच , आणि अभेध्य . पन्हाळ्या पासून १८ कोसांच्या अंतरावर उंच खाच खळग्यानी आणि कट्याकुट्यानि सजलेली .
 एका अजगराच्या विळख्यातून हिरडस मावळच्या वतनदार सरदारांनी स्वाराज्या चे प्राण वाचवले ते याच खिंडीत . त्या मातीला सुगंध आहे मावळ्यांच्या रक्ताचा तेथील पत्थरांना कान लावा मग ऐकू येतील शूरवीर ३०० रण मर्दांच्या डरकाळ्या आणि शौर्यगाथा . स्वराज्यासाठी अनेक मराठ्यांनी आपल्या प्राणाच्या आहुत्या दिल्या महाराजांनी  मान पान केला . या भीमपराक्रम नंतर जेधे घराण्याशी मसलत करून स्वराज्याचा सर्वात मोठा मान " धारेच्या पानाच्या पहिल्या समशेरीचा " रायाजी नाईक बांदल यांना देण्यात आला . स्वराज्याचा इतिहास अशाच नरसिंहांनी घड वला त्यापैकीच एक बाजी कृष्णाजी नाईक बांदल आणि त्यांचे पुत्र रायाजी बाजी नाईक बांदल , पण इतिहासाला त्यांची नवे कधी कळलीच नाहीत हे बांदल घराण्याचे दुर्भाग्याच...

 शिवरायांच्या प्राणांसाठी व स्वराज्याच्या अस्मितेसाठी आपल्या प्राणांची अहुती देणार्या, शिवा काशिद, बाजी प्रभू देशपांडे, बांदल सेना, जाधवराव, कटके, शिंदे, मोरे, इंगळे व इतर शेकडो नरवीरांना मुजरा.......🙏🙏🚩🚩

शनिवार, ११ जुलै, २०२०

बखर:अर्थ


'बखर' या शब्दाचा कोशातला अर्थ हकीकत, बातमी, इतिहास, कथानक,चरित्र असा आहे.. हा शब्द 'खबर' या फारशी शब्दापासून वर्णव्यत्यासाने आला असावा. बखरी ज्या काळात लिहिल्या गेल्या त्या काळात मराठी भाषेवर फारशी भाषेचे असलेले वर्चस्व लक्षात घेता वरील व्युत्पत्ती बरोबर असावी असे वाटते. वि.का. राजवाडे यांच्या मते 'बख=बकणे, बोलणें' या शब्दापासून बखर शब्द मराठीत आला असावा. राजवाड्यांना 'खबर' पासून 'बखर' ही व्युत्त्पत्ती मान्य नाही. राजवाडे म्हणतात 'बखर' हा शब्द भष् ,भख् ,बख् ,या धातूपासून निघाला आहे. तसा 'बखर' हा शब्द बख् या अपभ्रष्ट धातूपासून निघाला आहे. पूर्वी भाट लोक मोठमोठ्या वीरपुरुषांच्या 'बखरी' तोंडाने बोलत असत. त्यावरुन 'बखर' हा शब्द प्रथमतः तोंडी इतिहासाला लावू लागले आणि नंतर लेखी इतिहासालाही तो शब्द लावण्यात आला. (राजवाडे ले.सं.भा.३) या प्रमाणे 'बखर' या शब्दाची व्युत्पत्ती 'खबर' (फारशी) आणि भख् (संस्कृत) अशा दोनही शब्दापासून सांगता येते. या दोनही शब्दाचे मूळ एकच असण्याची शक्यता आहे.

बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे.तो मुख्यतःदक्षिण आशियातील, विशेषकरून मराठी साहित्यातील, ऐतिहासिक साहित्यातील एक प्रकार आहे. ऐतिहासिक घडामोडी, शूरवीरांचे गुणगान, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन बखरीत वाचावयास मिळते. आजवर २०० पेक्षा जास्ती बखरी लिहिल्या गेल्या असतील. जास्तीत जास्त बखरी इ.स.१७६० आणि १८५० च्या दरम्यान लिहिल्या गेल्या आहेत.


महत्त्वाच्या बखरी

  • शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर
श्री शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर आणि भोसले घराण्याची चरितावली : दत्ताजी त्रिमल वाकेनवीस याने इ.स. १७०१ ते इ.स. १७०६ या काळात ही बखर लिहिली. फार्सी तवारिखा वाचून बखर लिहिली अशी प्रेरणा लेखकाने नोंदविली आहे. या बखरीला तो आख्यान म्हणतो. यात ९० प्रकरणे आहेत. 'पुण्यश्लोकराजाची कथा’ लेखकाने स्वप्रेरणेने लिहिली आहे. अफझलखान वध प्रसंग, आग्ऱ्याहून सुटका, इत्यादी प्रसंग त्रोटक आहेत. राज्यभिषेकाचेही वर्णन मोजक्याच शब्दात येते. जुनी सभासदपूर्व बखर म्हणून हिला निश्चितच मोल आहे. या बखरीची नवी आवृत्ती (सन २०१८) वि.स. वाकसकर यांनी संपादित केली आहे व व्हीनस प्रकाशनने प्रसिद्ध केली आहे



  • सभासद बखर
सभासद बखर : कृष्णाजी अनंत सभासद याने छत्रपती शिवाजी, संभाजी व राजारामच्या काळातही मराठेशाहीची सेवा केली. छत्रपतींच्या दरबारात विविध पदांवर त्याने काम केले होते. शिवाजींचा राज्याभिषेक पाहण्याचेही भाग्य त्याला लाभले होते. छत्रपती राजारामसोबत जिंजीला असताना राजारामच्या आज्ञेनुसार इ.स. १६९७ च्या सुमारास सभासदाने शिवाजींच्या चरित्रावर बखर लिहून काढली. या बखरीत शिवाजी महाराजांचे सुरूवातीपासून ते शेवटपर्यंतचे सर्व पराक्रम वर्णन केले आहेत. ही बखर संक्षिप्त स्वरूपात असली तरी ही शिवकाळातील बखर असल्याने तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

  • भाऊसाहेबांची बखर
भाऊसाहेबांची बखर : ही मराठी भाषेतील एक प्रसिद्ध बखर आहे. मराठी वाङ्‌मयेतिहासातील अत्यंत लालित्यपूर्ण, श्रेष्ठ वाङ्मय गुणांनी युक्त असणारी नावाजलेली बखर म्हणजे भाऊसाहेबांची बखर. बखरीच्या कर्त्याबद्दल मतभिन्नता आढळते. कृष्णाजी शामराव व चिंतोकृष्ण वळे अशी नावे अभ्यासक मानतात; परंतु कृष्णाजी श्यामराव हेच याचे लेखक असावेत असे वाटते. बखरीचा रचनाकाळ इ.स. १७६२-६३ असावा.”भाऊसाहेबांची बखर’ असे याचे व्यक्तिवाचक नामाभिमान असले, तरी ही बखर व्यक्तिकेंद्रित नाही. इ.स. १७५३ साली रघुनाथरावांनी जाटाच्या कुंभेरीवर स्वारी केली. तेथपासून इ.स. १७६१ साली पनिपतच्या दारुण पराभवाने नानासाहेब पेशवे यांचे शोकावेगाने निधन झाले व माधराव पेशवेपदी आरूढ झाले, इथपर्यंतचा इतिहास व उत्तरी भारतातील मराठ्यांच्या राजकीय घडामोडींचे सूक्ष्म व साद्यंत वर्णन यात येते. त्यातील काही वाक्ये - जैसे भडभुंजे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात व्हावा तसा एक धडका जहाला. ”भाऊसाहेबांची बखर’ या विषयावर, याच नावाची मराठीत अनेक पुस्तके आहेत, त्यांतल्या काहींचे लेखक :

चितळे, जोशी
मु.श्री. कानडे
र.वि. हेरवाडकर
श.ना. जोशी


  • पनिपतीची बखर
पनिपतीची बखर : पनिपतच्या युद्धाचे वर्णन करणारी दुसरी बखर म्हणजे पानिपतीची बखर. लेखक रघुनाथ यादव. श्रीमंत महाराज मातु:श्री गोपिकाबाई यांच्या आज्ञेवरुन बखरीचे लेखन झाले. लेखनकाळ इ.स. १७७० च्या आसपास. या बखरीचा नायक कल्पांतीचा आदित्य-सदाशिवरावर भाऊ शिंदे-होळकरांच्या भांडणाला स्पष्ट उत्तर देणारा हा नायक, विश्वासरावाला गोळी लागताच गहिवरून येणारा भाऊ येथे दिसतो. भाऊसाहेबांची विविध रूपे लेखक चितारतो. युद्धवर्णनात त्यांचा हातखंडा आहे. वर्णनप्रसंगी तो रामायण महाभारताच्या उपमा वापरतो. निवेदनशैली, भाषा हुबेहूब वर्णन यात लेखक वाकबगार आहे. पनिपत ही मराठ्यांच्या इतिहासातील एक शोककथा आहे, आणि या शोककथेचा शोकात्म प्रत्यय बखरीत मिळतो हेच तिचे यश आहे. असे या बखरीबद्दल म्हटले जाते.

  • सप्तप्रकरणात्मक बखर
सप्तप्रकरणात्मक बखर : ही शिवाजीच्या चरित्रावर आधारित मल्हार रामराव चिटणीसविरचित सप्तप्रकरणात्मक बखर उत्तरकालीन आहे. या बखरीत छत्रपती शिवाजी महाराजांचे लोभस आदर्श राजा, महापुरुष म्हणून वर्णन केलेले आहे. शिवरायांचे संगीत-नाट्य, कलाकुशल व्यक्तिमत्त्वाचा; पराक्रमी, तेजस्वी राजा म्हणूनही परिचय होतो. बखरकाराने सुभाषितांचाही वापर केला आहे. मानवी स्वभावाचे विविध नमुने त्यांनी सादर केले आहेत. तत्कालीन लोकस्थितीचेही दर्शन या बखरीत आहे.



क्यू पाटील, और लडोगे ?

इसवी सन १७६०! मराठ्यांच्या दिग्विजयी फौजांनी नुकताच अफगाणिस्तानातल्या खैबरखिंडीत राहणाऱ्या कडव्या पठाणांचा समाचार घेतला होता.मराठा साम्राज्...